
मूल-चंद्रपूर :✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 खड्डेमुक्त करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार
यांचा पाठपुरावा फळाला आला आहे.
आज 15 ऑगस्ट रोजी आ. मुनगंटीवार यांनी NH विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. केळकर
यांच्यासह महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेत
उर्वरित पॅचेस वर्क आणि शोल्डर वर्क युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
पाहणी दरम्यान महामार्गावर डांबरीकरणाचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून आले.
Volvo रोलरच्या सहाय्याने नवीन डांबर टाकण्याचे काम सुरू असून, रस्त्याचा बराचसा
भाग खड्डेमुक्त झालेला आहे.
काय झालंय आतापर्यंत:
1. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
2. 6 ऑगस्टला अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
3. मोठ्या प्रमाणातील खड्डे आणि पॅचेस बुजविण्याचे काम पूर्ण
4. 39.674 किमी रस्त्यासाठी DBM-BC मजबुतीकरणाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे
5. 35.284 किमी साठी ₹56.09 कोटींचा अंदाजपत्रक सादर
आ. मुनगंटीवार म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही. दर्जेदार आणि
वेळेत काम पूर्ण करा.”
महामार्ग सुस्थितीत झाल्याने चंद्रपूर-मूल प्रवास सुकर होणार असून अपघातांचा
धोकाही कमी होणार आहे.
#NH930 #SudhirMungantiwar #Chandrapur #Sindhewahi #Road
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122
