Home चंद्रपूर जिल्हा इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार, सिंदेवाही तहसीलवर धडकले आंदोलन

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार, सिंदेवाही तहसीलवर धडकले आंदोलन

26
0

सिंदेवाही: पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज 29 मे 2026 रोजी सिंदेवाही तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना निवेदन सादर केले.

प्रमुख मागण्या: इंधन दर नियंत्रणात आणा, महागाई कमी करा, बेरोजगारीवर उपाय करा.

तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे व शहर अध्यक्ष सुनिलभाऊ उट्टलवार यांनी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर टीका केली. “महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे,” असे ते म्हणाले.

#SindewahiTimes #CongressProtest #Mehangai #Sindewahi

यावेळी जिल्हाध्यक्ष राजीव गांधी पंचायती राज संघटना, चंद्रपूरचे युनुसभाई शेख यांनी महागाईविरोधातील आगामी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. तसेच वाढत्या महागाईमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या वैश्विक आर्थिक संकटाविषयीही त्यांनी माहिती दिली.
या प्रसंगी नरेंद्र भैसारे (ब्लॉक अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग), स्वप्निलजी कावळे (माजी नगराध्यक्ष), संजय गहाने (उपाध्यक्ष), मंगेश मेश्राम, मंगेश गभने, पंकज नंनेवार, वीरेंद्र जैसवाल, सचिन नाडमवार, शाम छत्रवानी, पूजा रामटेके, वैशाली पुपरेड्डीवार, मीनाक्षी मेश्राम, महेश मंडलवार, जानिक वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे तालुका ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नागरिक व महिला भगिनींचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.
काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here