Home आरोग्य सिंदेवाहीत ३० ऑगस्टला महा-आरोग्य शिबिर: स्व. वासुदेवराव इरटवार यांच्या ११ व्या स्मृतिप्रित्यर्थ...

सिंदेवाहीत ३० ऑगस्टला महा-आरोग्य शिबिर: स्व. वासुदेवराव इरटवार यांच्या ११ व्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर

18
0
स्व. वासुदेवराव इरटवार यांच्या ११ व्या स्मृतिप्रित्यर्थ ३० ऑगस्ट २०२६ रोजी सिंदेवाही येथे आयोजित मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचा बॅनर.

सर्वोदय महाविद्यालयात सकाळी १० ते २ पर्यंत; दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगीचे तज्ञ डॉक्टर देणार सेवा,
आयुष्यमान कार्ड मोफत काढून मिळणार

सिंदेवाही, ✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

स्व. वासुदेवराव रं. इरटवार
यांच्या ११ व्या स्मृतिप्रित्यर्थ इरटवार परिवार, सिंदेवाही व दत्ता
मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे
ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य
मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक : रविवार, ३० ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत
स्थळ : सर्वोदय महाविद्यालय (सिनीअर कॉलेज) जाटलापूर रोड,
सिंदेवाही, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर

शिबिरात पुढील आजारांची तपासणी व उपचार केला जाईल :

* मेंदू विकार तज्ञ : डोक्या संबंधित आजार व पाठीच्या मनक्याशी
संबंधित आजार
* मेडिसिन तज्ञ : रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे
आजार, हृदय रोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, छातीत दुखणे
इत्यादी
* नेत्ररोग तज्ञ : डोळ्यांचे सर्व आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रिया,
तिरळेपणा इत्यादी
* सर्जरी तज्ञ : हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे
आजार, मुतखड्याचे आजार
* स्त्रीरोग तज्ञ : मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे
आजार इत्यादी
* बालरोग तज्ञ : हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या
विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण
* अस्थिरोग तज्ञ : संधिवात, मणक्यात असणारी गॅप, वाकलेले पाय,
फॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार

शिबिराची वैशिष्ट्ये :

• शिबीर स्थळावर नोंदणी मोफत, तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क
तपासणी मोफत
• भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या (एक्स-रे, रक्त, लघवी
चाचणी, सोनोग्राफी) मोफत
• महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल
• अतिविशिष्ट चाचण्या (सी.टी.स्कॅन, एम.आर.आय. इत्यादी)
आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ई.सी.जी. तपासणी मोफत
• भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत
• रुग्णाचा आजार कुठल्याही सरकारी योजनेत येत असल्यास,
सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल
• महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत
• या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा
देण्यात येईल
• फाटलेले ओठ, दुभंगलेले टाळू (जांभडा) तसेच जन्मतः असलेल्या
मुखविकृतीवर शस्त्रक्रिया मोफत
• गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले
जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत

सूचना : भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता गाड्यांची
व्यवस्था मोफत राहील. शिबिरासाठी येतांना आधार कार्ड व रेशन
कार्ड सोबत आणावे. आयुष्यमान कार्ड मोफत काढून देण्यात येईल,
त्यासाठी आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल व रेशन कार्ड
सोबत आणावे. या शिबिरामध्ये सावंगी मेघे रुग्णालयाचा कॉन्ट्रॅक्ट
आरोग्य कार्ड केवळ ३०० रुपयांमध्ये काढला जाईल.

अधिक माहिती करिता संपर्क :
श्री. सुशांत वा. इरटवार मो.नं. 7620171216
श्री. हितेशभाऊ सुचक मो.नं. 7020124292
श्री. किशोरभाऊ भरडकर (नगरसेवक) मो.नं. 9420114750
श्री. अभिजीतभाऊ मुंपिडीवार मो.नं. 8624800011

आयोजक : समस्त इरटवार परिवार, सिंदेवाही

अशाच आरोग्य विषयक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here