Home मुख्य बातम्या नेर येथे जय गौड कलाल समाजाचा ऐतिहासिक सोहळा; पापन्ना गौड महाराजांची ३७६...

नेर येथे जय गौड कलाल समाजाचा ऐतिहासिक सोहळा; पापन्ना गौड महाराजांची ३७६ वी जयंती थाटात साजरी – अध्यक्ष गणेश शिलकावार यांचे नेतृत्व

37
0

यवतमाळ, दि. १ सप्टेंबर २०२५:
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश गौड शिलकावार यांच्या नेतृत्वात जय गौड कलाल समाज संघटनेच्या वतीने श्री सरदार सरवाई पापन्ना गौड महाराज यांची ३७६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर पूजा अर्चना करून करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पापन्ना गौड महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शनपर भाषण केले व त्यांच्या शौर्यगाथेला उजाळा दिला
.स्थळ: हॉटेल बालाजी रेस्टॉरंट, बालाजी नगर, नेर

कार्यक्रमात खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला:
सौ. सुनिताताई प. जयस्वाल (नगराध्यक्षा, न.प. नेर) आणि श्री. पवनभाऊ जयस्वाल (मा. नगराध्यक्ष, न.प. नेर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेतृत्व:
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश गौड शिलकावार यांच्या नेतृत्वात हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सोबत राष्ट्रीय उप-कोषाध्यक्ष बाबाराव देवलवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नारायण गौड सिलेवार, डॉ. रामाराव गौड सौं स्मिताताई दुधीवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात समाजातील एकजुटीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय गौड कलाल समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
💐 महाराजांच्या प्रतिमेचे सुंदर पूजन व फुलांच्या माळांनी सजावट
💐 २०० समाज बांधवांसाठी महाप्रसाद / जेवणाची व्यवस्था
💐 संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून समाज बांधवांची उपस्थिती
💐 आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
💐 पापन्ना गौड महाराजांच्या शौर्यगाथेवर मार्गदर्शनपर भाषण
जेवणाची व्यवस्था आणि पाहुण्यांचा सन्मान:
कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून समाज बांधवांना बोलविण्यात आले होते. यावेळी तब्बल २०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हा कार्यक्रम म्हणजे गौड कलाल समाजाच्या एकतेचे आणि संस्कृती जपण्याचे उत्तम उदाहरण ठरला.
जय गौड! जय पापन्ना महाराज!

अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा

जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.

✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here