Home चंद्रपूर जिल्हा सिंदेवाहीतून कांचन पांडे यांची ब्रम्हपुरी येथे बदली; सौ. लता वाडिये मॅडम यांनी...

सिंदेवाहीतून कांचन पांडे यांची ब्रम्हपुरी येथे बदली; सौ. लता वाडिये मॅडम यांनी स्वीकारला पोलीस निरीक्षक पदाचा पदभार

25
0

सिंदेवाही (ता. २९ सप्टेंबर):✍️स्वामी गोलपल्लीवार  मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स                          सिंदेवाही पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे यांची ब्रम्हपुरी येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या नव्या पोलीस निरीक्षक म्हणून सौ. लता वाडिये मॅडम यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी मावळते पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन सौ. लता वाडिये मॅडम यांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन केले. हा पदभार सोहळा पोलीस स्टेशनमध्ये उत्साहात पार पडला.

श्री. कांचन पांडे यांनी सिंदेवाहीतील कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले असून, त्यांना ब्रम्हपुरी येथील नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

तर सौ. लता वाडिये मॅडम यांच्या नियुक्तीमुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे. कर्तव्य, सेवा, सुरक्षा या महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्यानुसार त्या आपली जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सिंदेवाही टाईम्स परिवाराकडून श्री. कांचन पांडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि सौ. लता वाडिये मॅडम यांना नवीन जबाबदारीसाठी हार्दिक अभिनंदन!

#SindewahiTimes #सिंदेवाहीपोलीस

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.

 

✍️स्वामी गोलपल्लीवार

मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

9404530122

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here