Home चंद्रपूर जिल्हा ताडोबात पर्यटन हंगामाचा धमाकेदार शुभारंभ: पहिल्याच दिवशी तेलिया तलावात ‘कॉलर वाली’ वाघिणीचे...

ताडोबात पर्यटन हंगामाचा धमाकेदार शुभारंभ: पहिल्याच दिवशी तेलिया तलावात ‘कॉलर वाली’ वाघिणीचे दर्शन!

19
0
ताडोबात नव्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी तेलिया परिसरात पर्यटकांना दर्शन देणारी कॉलर वाली वाघीण आणि मोहर्ली गेटवर सफारीचा शुभारंभ करताना अधिकारी.

ताडोबा ब्रेकिंग
3 महिन्यांनंतर ताडोबा कोअर झोन सुरू! पहिल्याच दिवशी तेलिया तलावात कॉलर वाली वाघिणीचे दर्शन!
पर्यटकांमध्ये जल्लोष!
#Tadoba #SindewahiTimes
ताडोबा-अंधारी (ता. १ ऑक्टोबर):
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये बुधवार, १ ऑक्टोबरपासून नव्या पर्यटन हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांना मोठी पर्वणी मिळाली – मोहर्ली गेटवरून सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना तेलिया तलाव क्षेत्रात प्रसिद्ध ‘कॉलर वाली’ वाघिणीचे दर्शन झाले.
पावसाळ्यानंतर ताडोबाचे जंगल हिरवाईने नटले असून जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी असल्याने वन्यजीवांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळेच पहिल्याच सफारीत वाघिणीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह आणि रोमांच वाढला आहे.

मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
मोहर्ली गेट येथे उपसंचालक (कोअर) आनंद रेड्डी येल्लू यांच्या नेतृत्वात रिबन कापून सफारी हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पर्यटक गाईड वसंत सोनुले आणि शहनाज बेग यांनी पारंपरिक पूजा केली.
वनविभागातर्फे पहिल्या दिवशी आलेल्या पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ताडोबा होमस्टे असोसिएशनने देखील पर्यटकांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, ACF नाथू, टुरिझम RFO अरुण गोंड, मोहर्ली कोअरचे RFO एस.बी. आवधान यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोअर झोन खुला होताच ताडोबात पर्यटनाच्या हालचाली पुन्हा वेगाने सुरू झाल्या असून येत्या काळात देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची अपेक्षा आहे.
#Tadoba #CollarwaliTigress #TATR #MoharliGate #TadobaSafari #Chandrapur #TeliyaLake #SindewahiTimes

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here