Home 'आपली माणसं' अभिमानास्पद! संतोष नन्नावार यांची राष्ट्रीय स्तरावरील सायबर सुरक्षा प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून...

अभिमानास्पद! संतोष नन्नावार यांची राष्ट्रीय स्तरावरील सायबर सुरक्षा प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून निवड

39
0

सिंदेवाही, दि. १६ ऑक्टोबर : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील लोकविद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक *संतोष दामोदर नन्नावार* यांची राष्ट्रीय स्तरावर सायबर सुरक्षा व सुरक्षितता प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) व केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET) यांच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे.

दि. २४ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान NCERT, CIET, ISEA, C-DAC आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा व सुरक्षिततेवर तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशभरातील विविध राज्यांतील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

मूल्यमापन व अंतिम परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणित एक्सपर्ट ट्रेनर म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये संतोष नन्नावार यांनी बाजी मारली आहे.

या यशाबद्दल नन्नावार यांनी NCERT नवी दिल्ली, SCERT पुणे, DIET चंद्रपूर, पंचायत समिती नागभीडचे संबंधित अधिकारी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

सिंदेवाही टाईम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here