Home चंद्रपूर जिल्हा गोसीखुर्द नहराचे पाणी थकाबाई तलावात! शेतकऱ्यांनी मानले आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे मनस्वी...

गोसीखुर्द नहराचे पाणी थकाबाई तलावात! शेतकऱ्यांनी मानले आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे मनस्वी आभार

25
0

सिंदेवाही ( स्वामी गोलपल्लीवार):
सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गोसीखुर्द नहराचे पाणी इंजिनद्वारे थकाबाई तलावा मध्ये टाकण्यात आले असून आज दि. 25 ऑक्टोबर 2026 पासून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विशेष प्रयत्न केल्याने 80% शेती जी एका पाण्याने मरत होती, ती वाचली असून शेतकऱ्यांना आशेचा जीवनदान मिळाले आहे.
थकाबाई तलावाची पाहणी, सिंचन प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पाऊल!
मिळालेल्या माहितीनुसार, लोनवाही, सिंदेवाही, इंदिरानगर, जाटलापूर, गडमौशी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना स्पॉटवर बोलावून थकाबाई तलावाच्या सिंचन प्रश्नाची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या विजयभाऊंनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देत दि. 24/10/2026 पासून इंजिनद्वारे गोसीखुर्दचे पाणी थकाबाई तलावात टाकण्याचे काम सुरू केले.

या कामासाठी सर्वस्वी प्रयत्नशील असणारे शेतकरी –
दामोधर नन्नावार, चंदू पाटील बोरकर, अभिजीत मुपीडवार, विनोद प्र.बोरकर, सचिन नाडमवार, अशोक जीवने, नरेश रामटेके, नंदू नागापुरे, काशिनाथ नागापुरे, मनोज मधुकर बोरकर, विवेक वाढई, दीपक बारसागडे, निखिल नागापुरे, देविदास नागापुरे, विजय नागरे, मधु पाटील बोरकर, भास्कर नागापुरे, दंडीकवार गडमौशी, विनायक कावडे, पार्वताबाई रामटेके, सतीश नागोसे, रोहिदास गेडाम, अमृत साखरे, मुरलीधर कुळसंगे, इंद्रजीत खोब्रागडे, रमेश भरडकर, सचिन मेश्राम, ओमप्रकाश बोरकर, मनोज नागापुरे आदींनी विजयभाऊंचे मनापासून आभार मानले आहेत.
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया:
“80% शेती एका पाण्याने मरत असताना विजयभाऊंमुळे आम्हाला जीवनदान मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नानेच आज तलावात पाणी आले आहे,” अशी भावना सर्व शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here