नवी दिल्ली / सिंदेवाही (ता. ३० सप्टेंबर):

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
वाहतूक नियम मोडून ई-चालान न भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी. सुप्रीम कोर्टाने अशा वाहनधारकांवर कठोर कारवाईचे निर्देश सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, बकाया ई-चालान असलेल्या वाहनांची रँडम तपासणी करावी आणि चालान भरले नसल्यास थेट वाहन जप्ती (Vehicle Seize) ची कारवाई करावी.
काय होणार नवीन कारवाईत?
1. चालान भरले नाही तर गाडी जप्त केली जाईल.
2. बकाया चालान असेपर्यंत वाहनाच्या सर्व ऑनलाईन सेवा बंद – म्हणजे RC Renewal, Duplicate RC, पत्ता बदलणे, गाडी विक्री (Transfer) काहीच होणार नाही.
3. वाहनाला परिवहन पोर्टलवर Blacklist केले जाईल.
4. वारंवार नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणावर बंदी आणि आहे ते लायसन्स सुद्धा निलंबित (Suspend) केले जाऊ शकते.
5. फिटनेस आणि PUC सर्टिफिकेट सुद्धा दिले जाणार नाही.
देशभरात 49 हजार कोटी थकबाकी!
कोर्टाला सांगण्यात आले की, देशभरात जवळपास 49,194 कोटी रुपयांचे ई-चालान वसूल करणे बाकी आहे, तर फक्त 26,175 कोटी रुपये वसूल झाले आहेत. कोर्टाने म्हटले की, फक्त चालान काढून उपयोग नाही, वसुली पण झाली पाहिजे.
हा आदेश एस. राजशेखरन विरुद्ध केंद्र सरकार या 2012 पासून सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा प्रकरणात 28 सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे.
सिंदेवाहीकरांनो, तुमच्या गाडीवर काही चालान आहे का ते लगेच echallan.parivahan.gov.in वर चेक करून भरा, नाहीतर उद्या अडचण होईल!
#EChallan #SupremeCourt #TrafficRules #VehicleSeize #RTO #ChandrapurPolice #SindewahiTimes
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122
