https://sindewahitimes.in/हजारीचक-विहिरीत-वाघाचा-मृत्यू/`
*‘सिंदेवाही टाइम्स’ – ब्रेकिंग न्यूज #स्वामी गोलपल्लीवार*
*बातमी:*
*सिंदेवाही/ब्रम्हपुरी:* चारगाव येथील शेतकरी मिलिंद गजभिये यांना आज सकाळी 9 वाजता हजारीचक शिवारातील पांडुरंग गजभिये यांच्या शेतातील उघड्या विहिरीत वाघ पडल्याची माहिती मिळाली.
वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सर्वे नं. 51 मधील सिमेंटच्या दगडाची कठडा नसलेली 25-30 फूट खोल विहीर होती. अंदाजे 7 ते 8 वर्षीय नर वाघाचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. नायलॉन दोर व वाघरीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, ACF अरविंद जे., NTCA प्रतिनिधी बंडू धोत्रे, Swab Nature Care चे यश कायरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी शवविच्छेदन केले. सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीचा संशय नाही. घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
*सिंदेवाही टाइम्स सवाल:* ताडोबा कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या उघड्या विहिरींना कठडे कधी? हा 3 दिवसातील दुसरा वाघाचा बळी.
हजारीचक शिवारात 7 वर्षीय वाघाचा
उघड्या विहिरीत पडून मृत्यू 🐅💔
दि. 31/05/2026, सकाळी 9 वाजता घटना
वनविभागाने अंत्यसंस्कार केले
उघड्या विहिरी = वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा
#SindewahiTimes #TigerDeath #Bramhapuri
ताडोबा कॉरिडॉर ‘डेथ झोन’ बनलाय का?
उघड्या विहिरींना कठडे कधी? 🤔
#SaveTigers #SindewahiTimes
—

