सिंदेवाही, 22 मे 2026: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावाजवळील जंगल परिसरात आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला केला असून, या हल्ल्यात चौघींचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही येथील काही महिला आज सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे:
1. सुनीता कौशिक मोहूरले, वय 35
2. संगीता संतोष चौधरी, वय 40
3. अनीता दादाजी मोहूरले, वय 45
4. कविता दादाजी मोहूरले, वय 48
एकाच कुटुंबातील 3 महिला असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
जंगलात जाण्याची भीती वाढली
दरवर्षी हजारो महिला तेंदूपत्ता हंगामात जंगलात जातात. मात्र गेल्या काही महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. “तेंदूपत्ता तोडायला जंगलात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे झाले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कुटुंबांना मदतीची मागणी
मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी पंचनामा करत आहेत.
‘सिंदेवाही टाइम्स’ या घटनेचा पाठपुरावा करत असून, अधिक माहिती मिळताच अपडेट देण्यात येईल.
#वाघहल्ला #सिंदेवाही #गुंजेवाही #TigerAttack #Chandrapur #ब्रेकिंग #सिंदेवाहीटाइम्स

