Home चंद्रपूर जिल्हा पावसाळ्यापूर्वीची तयारी: नगराध्यक्ष एकता समर्थ यांची प्रभाग 1 व 2 मध्ये पाहणी,...

पावसाळ्यापूर्वीची तयारी: नगराध्यक्ष एकता समर्थ यांची प्रभाग 1 व 2 मध्ये पाहणी, सीओ टीमसह नालेसफाईचे नियोजन

19
0

मुल: पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगराध्यक्ष सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी आज सीओ साहेबांच्या टीमसह प्रभाग क्र. 1 व 2 ची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीत उपस्थित:
यावेळी नगरसेवक प्रशांत समर्थ, काजल धारणे, तुकाराम गुरनुले, अश्विनी निकोडे व सर्व विभागीय कर्मचारी उपस्थित होते. नाले, गटारे व पाणी निचरा होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून तातडीने सफाईचे निर्देश देण्यात आले.

प्रत्येक प्रभागात नियोजन:
नगराध्यक्ष एकता समर्थ म्हणाल्या, “पावसाळ्यापूर्वी प्रत्येक प्रभागात जाऊन समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील. नागरिकांनीही सहकार्य करावे.”

📍 मुल, जि. चंद्रपूर
✍️ सिंदेवाही टाइम्स प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here