Home आरोग्य मूल येथील श्री जय झूलेलाल मंदिरात १ ऑगस्ट रोजी डॉ. ममतानी यांचे...

मूल येथील श्री जय झूलेलाल मंदिरात १ ऑगस्ट रोजी डॉ. ममतानी यांचे ३०३ वे मोफत आयुर्वेदिक शिबिर

36
0
मूल येथील श्री जय झूलेलाल मंदिरात १ ऑगस्ट रोजी डॉ. ममतानी यांचे मोफत आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर होणार आहे.

✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
मूल । प्रतिनिधी

‘घराघरात आयुर्वेद’ या उद्देशाने पूज्य सिंधी पंचायत, मूल आणि आरोग्यधाम हेल्थकेअर सोसायटी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य मोफत आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जी-कुमार आरोग्यधामचे संचालक डॉ. जी. एम. ममतानी आणि डॉ. अंजू ममतानी यांच्या मार्गदर्शनाखाली होणारे हे राज्यभरातील ३०३ वे शिबिर आहे.
ठिकाण आणि वेळ
हे शिबिर सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत श्री जय झूलेलाल मंदिर, ताडाळा रोड, गणेश मंदिराजवळ, मूल येथे होणार आहे.
फोटोमध्ये दिसणारे हेच मंदिर आहे.
मोफत तपासणी आणि मार्गदर्शन
शिबिरात संधिवात, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, सायटिका, स्लिप डिस्क, त्वचारोग, स्त्रीरोग, वंध्यत्व, लठ्ठपणा, केस गळणे यासह अनेक आजारांवर मोफत आयुर्वेदिक व पंचकर्म उपचारासंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन मिळेल.
पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष अमर आयलानी आणि उपाध्यक्ष विजय केशवानी म्हणाले की, शिबिरात येणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर तपासणी करण्यात येईल. तसेच ‘स्वास्थ्य वाटिका’ मासिक विनामूल्य दिले जाईल.
नोंदणी
इच्छुकांनी १ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत शिबिरस्थळी नोंदणी करावी.
पूर्वनोंदणी:
जी-कुमार आरोग्यधाम, नागपूर
– ०७१२-२६४५६००, ०७१२-२६४६०, ९३७३३९७२५८
जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #Mul #ZulelalMandir #AyurvedaCamp #DrMamtani #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here