Home मुख्य बातम्या “डॉ. कलामांना अपेक्षित कार्य गुडधे गुरुजी करत आहेत” – शेख जैरुद्दीन पुण्यतिथी...

“डॉ. कलामांना अपेक्षित कार्य गुडधे गुरुजी करत आहेत” – शेख जैरुद्दीन पुण्यतिथी निमित्त गोपाळ गुडधे यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना प्रेरणा

20
0
वरोरा येथील लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार अभ्यास केंद्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुण्यतिथी निमित्त गोपाळ गुडधे गुरुजींचा सत्कार करताना फाउंडेशनचे अध्यक्ष शेख जैरुद्दीन छोटूभाई. सोबत विद्यार्थी व पदाधिकारी

वरोरा । प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती, “मिसाईल मॅन” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन, वरोरा च्या वतीने लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड वरोरा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सकाळी डॉ. कलाम चौकातील फलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर सायंकाळी अभ्यास केंद्राला भेट देऊन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या 15 वर्षांपासून मोफत इंग्रजी स्पोकन वर्ग घेऊन विद्यार्थी घडविणारे गोपाळ गुडधे गुरुजी यांचा सत्कार केला.
फाउंडेशनचे अध्यक्ष शेख जैरुद्दीन छोटूभाई यांच्या हस्ते गुडधे गुरुजींना डॉ. कलाम यांचा फ्रेम केलेला फोटो व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अभ्यास केंद्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्रमोद वाभिटकर, आशिष घुमे, संजय दानव, प्रशांत पिपरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निस्वार्थी कार्याचा गौरव
सत्काराला उत्तर देताना शेख जैरुद्दीन म्हणाले, “गुडधे सरांनी कोरपना-पारडी, वरोरा-साखरा आणि चिमूर-बोथली या जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘Go With Structure’ च्या माध्यमातून मराठी मुलांच्या मनातून इंग्रजीची भीती घालवली. आपल्या उन्हाळी सुट्ट्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या. डॉ. कलामांना अपेक्षित असलेले कार्य ते करत आहेत.“वरोरा शहरातील झोपडपट्टीतील मुलांना दररोज सायंकाळी ते मोफत इंग्रजी शिकवतात. त्यांच्या या कार्याचे सर्वांनी कौतुक केले

TAGS: #Varora #APJAbdulKalam #Students #StudyCenter #SindavahiTimes
प्रेरणेचा स्रोत – डॉ. कलाम 🙏📚
वरोरा येथील सामूहिक अभ्यास केंद्रात “मिसाईल मॅन” डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचा सत्कार.
विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्वप्नांचा संदेश दिला.
#APJAbdulKalam #Varora #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here