
सिंदेवाही: सामान्य नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आजारी, गरजू आणि वेदनाग्रस्तांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
नवरगाव येथे नुकत्याच उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी आत्मस मोरे, नवरगावचे सरपंच राहुल बोडणे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हजारो नागरिकांना होणार लाभ
आमदार वडेट्टीवार म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अशी सुसज्ज आरोग्य केंद्रे आवश्यक आहेत. या नवीन इमारतीमुळे नवरगाव परिसरातील हजारो नागरिकांना माता-बाळ संगोपन, नियमित लसीकरण, अपघातकालीन उपचार तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे.
अधिकाऱ्यांना दिले निर्देश
यावेळी आमदारांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरणे आणि डॉक्टर-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. नागरिकांशी संवेदनशीलतेने आणि आपुलकीने वागावे असेही त्यांनी सांगितले.
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती| बातम्या |विशेष लेख प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स
9404530122

