Home चंद्रपूर जिल्हा ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग: चिंचोळी एमआयडीसीत बनावट दारूचा कारखाना उध्वस्त 12 तास चालली धाड, अडीच...

ब्रेकिंग: चिंचोळी एमआयडीसीत बनावट दारूचा कारखाना उध्वस्त 12 तास चालली धाड, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

28
0

🚨 ब्रेकिंग: सोलापूरात अडीच कोटींची बनावट दारू जप्त 🚨
सोलापूर | प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीमध्ये बनावट टॅंगो पंच आणि भिंगरी या देशी दारूच्या ब्रँडची निर्मिती करणारी अवैध फॅक्टरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली आहे. बुधवारी (२९ जुलै) सकाळी टाकलेल्या धाडीत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई तब्बल १२ तास सुरू होती. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, पोलिस निरीक्षक श्री. पाटील आणि त्यांच्या पथकाने सकाळी सुमारे १० वाजता चिंचोळी एमआयडीसीतील एका मोठ्या गोडावूनवर छापा टाकला. बाहेरून साधे सिमेंट कंपाउंड असलेल्या या गोडावूनमध्ये बनावट दारू निर्मितीचा पूर्ण कारखानाच सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना १४ हजार लिटर स्पिरीट (७० बॅरल), ४७० बॉक्स तयार दारू, हजारो रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य, दोन बॉटलिंग मशिन्स आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी सात वाहने आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दुसऱ्या गोडावूनमध्ये तयार दारूचा साठा
तपासात बनावट दारूची निर्मिती एका गोडावूनमध्ये होत असल्याचे, तर तयार दारूचा साठा शेजारच्या आणखी दोन गोडावूनमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, गोडावूनचे मालक कोण आणि या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, याचा तपास उत्पादन शुल्क विभाग करत आहे. गोडावूनमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परराज्यातील, विशेषतः बिहारमधील असल्याची माहिती मिळाली आहे.
कारवाई करणारे पथक
अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, निरीक्षक श्री. पाटील व त्यांच्या पथकाने ही धाड टाकली.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #ChincholiMIDC #FakeLiquor #Solapur #ExciseRaid #BreakingNews #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here