Home चंद्रपूर मूल शहरातील पडलेले दुभाजक होणार विकसित; महामार्गाचीही होणार दुरुस्ती – आ. सुधीर...

मूल शहरातील पडलेले दुभाजक होणार विकसित; महामार्गाचीही होणार दुरुस्ती – आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद; २.७९७ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ७ लाख निधी मंजूर

14
0

 

मूल शहरातील महामार्ग दुरुस्ती व दुभाजक विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी JCB चे विधिवत पूजन करताना भाजपा पदाधिकारी व उपस्थित मान्यवर.

मूल, दि. २० ऑगस्ट २०२६ :
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
मूल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील
दुभाजकांची झालेली दुरवस्था तसेच रस्त्याच्या आवश्यक दुरुस्तीचा प्रश्न
आता मार्गी लागला आहे.
माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण
पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० अंतर्गत मूल शहरातील
सुमारे २.७९७ किलोमीटर अंतराच्या सुधारणा कामाला मंजुरी मिळाली असून,
यासाठी तब्बल ४ कोटी ७.३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.
मूल शहरातून जाणारा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता
आणि त्यावरील दुभाजक आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून
साकारण्यात आला होता. या रस्त्यामुळे मूल शहराच्या सौंदर्यात मोठी भर
पडली होती.
मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावरील
दुभाजक ठिकठिकाणी खचले होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम
होण्यासोबतच वाहतुकीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
ही बाब भाजपा नेत्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निदर्शनास
आणून दिली. नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी मुनगंटीवार
यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन
दुरुस्तीची आवश्यकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या कामात सुमारे २.५ किलोमीटर लांबीचे दुभाजक विकसित करणे, ३०० मीटर
लांबीच्या नालीचे बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, थर्मोप्लास्टिक पेंटद्वारे
रोड मार्किंग करणे, दिशादर्शक व इशारा फलक बसविणे तसेच वाहतूक
सुरक्षिततेसाठी रंबल स्ट्रिप्स बसविणे आदी कामांचा समावेश आहे.
या कामामुळे मूल शहरातील महामार्गाचा चेहरामोहरा पुन्हा बदलणार असून,
वाहतुकीची सुरक्षितता वाढणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले, तालुकाध्यक्ष
चंदू मारगोनवार, ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी, अविनाश जगताप,
अजय गोगुलवार, प्रा. डॉ. सौ. किरणताई कापगते-बोरकर, जिल्हा युवा
महामंत्री राकेश ठाकरे, जितेंद्र टिंगुसले, प्रशांत बोबाटे, प्रा. संजय
येरोजवार, विवेक मांडाळे, युवराज चावरे, सुनील कुकुडकर, रुपेश निकोडे,
दीपक बोर्डावार, योगेश लेंगुरे, संकेत निकुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी,
कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके|
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here