✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
सिंदेवाही: तुमच्या दुचाकी, चारचाकीवर अजूनही ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) नसेल तर आजच सावध व्हा. कारण उद्या, 1 जुलै 2026 पासून HSRP नसलेल्या वाहनांवर राज्यभरात कडक दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.
30 जून ही अंतिम मुदत संपत असल्याने परिवहन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंद्रपूर RTO कडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील हजारो वाहने अजूनही जुन्या नंबर प्लेटवर फिरत आहेत.
🔴 RTO ची ‘ही’ 4 कामे उद्यापासून बंद:
1. वाहन हस्तांतरण: गाडी विकता येणार नाही, नावावर करता येणार नाही.
2. पत्ता बदल: RC वर पत्ता अपडेट होणार नाही.
3. कर्ज नोंद/रद्द (Hypothecation): बँकेचे कर्ज घेतले किंवा फेडलेले दाखवता येणार नाही.
4. परवाना नूतनीकरण: फिटनेस, परमिटसारखी कामे थांबणार.
केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 50 व कलम 177 नुसार थेट दंड होणार आहे.
💡 दिलासा कुणाला? ज्यांनी 30 जूनपर्यंत https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांच्यावर तात्पुरती कारवाई होणार नाही. पण नोंदणीच केली नसेल तर थेट दंड निश्चित.
सिंदेवाहीतील वाहनधारकांनी काय करावे?
1. आजच नोंदणी करा: आपल्या मोबाईलवरूनच HSRP साठी अप्लाय करा.
2. डीलर गाठा: तुमच्या गाडीच्या कंपनीच्या अधिकृत डीलरकडे जाऊन प्लेट बसवून घ्या.
3. RTO मध्ये गर्दी टाळा: 1 जुलैपासून RTO मध्ये हेलपाटे मारावे लागतील.
शासकीय कार्यालयांनाही 30 जूनपूर्वी HSRP बसवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे नागरिकांनी दंड आणि मनस्ताप टाळण्यासाठी आजच कार्यवाही करावी, असे आवाहन सिंदेवाही उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
डीलर लिस्ट: सिंदेवाहीतील हिरो, होंडा, बजाज, डीलरकडे HSRP बसवून मिळते.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स
9404530122

