Home राज्य डॉ. गायत्री रामटेके यांना ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’ ने गौरव

डॉ. गायत्री रामटेके यांना ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’ ने गौरव

28
0

संगमनेर, अहिल्यानगर: तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र घोसाळे सर यांच्या संकल्पनेतून “संविधान अमृत महोत्सव आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026″ सोहळा गुरुवार 4 जून 2026 रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

75 मान्यवरांचा सन्मान:
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 75 मान्यवरांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026” देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूरच्या डॉ. गायत्री रामटेके यांचा समावेश आहे.

डॉ. गायत्री रामटेके यांचे कार्य:
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. गायत्री रामटेके यांचा सन्मान करण्यात आला. “मी रमाई बोलतेय, मी सावित्री बोलतेय, मी जिजाऊ बोलतेय” या एकपात्री प्रयोगांद्वारे त्या महामानवांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे महान कार्य करत आहेत. आमदार डॉ. किरण लहमटे साहेब यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. संघराज दादासाहेब रूपवते, प्रमुख वक्ते प्रा. मुकुंद भारसाकळे, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात साहेब, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब, अकोले विधानसभेचे आमदार डॉ. किरण लहमटे साहेब, सुमेध बोधी भंते यांची प्रमुख उपस्थिती होती. आद. अशोक शिंदे, आद. सुरेश देठे, गितांजली रामटेके यांचीही उपस्थिती लाभली.

📍 मालपाणी लॉन्स, संगमनेर, जि. अहिल्यानगर
🔗 सविस्तर बातमी: https://sindewahitimes.in/dr-gayatri-ramteke-maharashtra-ratna-award-2026/
✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here